राज्यस्तरीय एमएसडीसी परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पटकावली तब्बल सोळा पारितोषीके कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार
भारतीय दंत परिषदेच्या (IDA) वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘63 महाराष्ट्र स्टेट डेंटल कॉन्फ्रन्स 2024’ मध्ये लातूर येथील एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दंत शाखेतील विविध विभागातील एम. डी. एस. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी व प्राध्यपकांनी सादर केलेल्या पेपर व पोस्टर्स सादरीकरणास अनुक्रमे प्रथम, व्दितीय अशी तब्बल 16 पारितोषिक मिळाली आहेत.
विजेते विद्यार्थी व प्राध्यापकांना कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेश कांगणे, बाल दंत रोग तज्ञ डॉ. योगेश काळे, मुख शल्य तज्ञ डॉ. अमोल डोईफोडे, विभाग प्रमुख डॉ. सुसेन गांजरे, डॉ. राघवेंद्र मेत्री, डॉ. प्रवीण कुमार मरुरे, डॉ. विजयालक्ष्मी माले हे उपस्थित होते.
भारतीय दंत परिषदेच्या (IDA) नांदेड शाखेच्या वतीने नांदेड येथे दि. 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर या कालावधित संपन्न झालेल्या राज्यस्तरीय एमएसडीसी परिषदेत एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील दंत परिवेष्ठन शास्त्र विभागातील एम. डी. एस. अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थीनी डॉ. ऋतुजा शिवपुरकर यांनी ‘स्क्रु रिटेन्ड व्हर्सेस सिमेंट रिटेन्ड इम्प्लॅन्ट सपोर्टेड फिक्सड डेंटल प्रोस्थेसिस’ या विषयावर तर डॉ. प्रतिक्षा लाटे यांनी ‘गाईडेड इम्प्लॅन्ट सर्जरी’ या विषयावर सादर केलेल्या पोस्टर सादरीकरणास प्रथम पारितोषीक मिळाले आहे. तसेच ‘सॉकेट शिल्ड टेक्निक’ या विषयावर डॉ. स्नेहल जाधव तर ‘ट्रिटमेंट ऑफ इम्पॅक्टेड प्रिमोलर’ या विषयावर डॉ. प्रतिक्षा लाटे डॉ. यांनी सादर केलेल्या पेपर सादरीकरणास प्रथम पारितोषीक मिळाले आहे.
कृत्रिम दंत रोपन विभागातील एम. डी. एस. अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षातील विद्यार्थीनी डॉ. अव्दैता आवाळे यांच्या ‘हॉलो बल्प ऑप्च्युरेटर’ या विषयावरील पेपर सादरीकरणास प्रथम तर डॉ. स्वेता मिश्रा यांच्या ‘लॅमिनेट विनिअर’ सादरीकरणास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. त्याचबरोबर ‘स्प्लिट डेंचर’ या विषयावर डॉ. योगीनी शेंडे यांच्या पोस्टर सादरीकरणास प्रथम पारितोषीक मिळाले. यासाठी विभाग प्रमुख डॉ. सुशेन गाजरे, डॉ. भूषण बांगर, डॉ. शशी पाटील, डॉ. शिरीष पवार, डॉ. शितल वाघ यांनी मार्गदर्शन केले.
मुख शल्य विभागातील एम. डी. एस. अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षातील विद्यार्थी डॉ. ऋत्विक खांडरे यांच्या ‘सुपरेटिव ऑस्टीओमालायटीस’ या विषयावरील पेपर सादरीकरणास प्रथम तर व्दितीय वर्षातील डॉ. अंजली वशिष्ठ यांनी ‘कम्प्युटर एडेड रिकंट्रक्शन’ या विषयावरील पेपर सादरीकरणास व्दितीय पारितोषीक मिळाले आहे. यासाठी विभाग प्रमुख डॉ. शिराज बादल, डॉ. अमोल डोईफोडे, डॉ. गोविंद चांगुले, डॉ. पुनम फड, डॉ. गोपाळ नागरगोजे, डॉ. व्यंकटेश हंगे यांचे मार्गदर्शन लाभले.
ऑर्थोडाँटिक विभागातील एम. डी. एस. अभ्यासक्रमाचे तृतीय वर्षातील विद्यार्थी डॉ. आवेश भोईर यांनी ‘एक्सट्रुजन ऑफ ऑर्थोडाँटिक्स टुथ’ या विषयावर तर डॉ. मंजुषा पाटील यांनी ‘ऑक्सट्रक्टिव स्पि ॲकनिया’ या विषयावरील पेपर सादरीकरणास प्रथम तर डॉ. सिध्दांत जाधव यांच्या ‘ॲक्युरो गाईड’ या विषयावरील पेपर सादरीकरणास द्वितीय पारितोषिक मिळाले आहे. यासाठी विभाग प्रमुख डॉ. प्रवीण कुमार मरुरे, डॉ. शिल्पा बिक्कड, डॉ. सुजित झाडके यांनी मार्गदर्शन केले.
बाल दंत रोग विभागातील सिनियर लेक्चरर डॉ. प्राजक्ता गायकवाड व मुख औषधशास्त्र व क्ष – किरण शास्त्र विभागातील सिनियर लेक्चरर डॉ. सायोज्यता बांगर यांनी सादर केलेलल्या ‘हर्नेसिंग प्लासमिड टेक्नॉलॉजी: इन जिन ॲक्टीवेशन इन डेंटल ॲप्लिकेशन’ या विषयावरील पोस्टर सादरीकरणास प्रथम पारितोषीक तर डॉ. सायोज्यता बांगर व डॉ. प्राजक्ता गायकवाड यांच्या ‘टोबॅको अवेरनेस ऑन ओरल हेल्थ’ या विषयावरील पेपर सादरीकरणास प्रथम पारितोषीक मिळाले आहे.
या यशाबद्द्ल यशस्वी विद्यार्थी व प्राध्यापकांचे एमआयडीएसआर दंत महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांकडून अभिनंदन होत आहे.